तोपर्यंत ‘काँग्रेस’चा संघर्ष सुरुच राहणार- बाळासाहेब थोरात

मुंबई | कृषी विधेयकांवरून देशातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं आहे. काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांसोबत आहे आणि केंद्र सरकार हे काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करेल, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने अनेक खासदारांचा विरोध असताना देखील कृषी विधेयकं मंजूर करून घेतली. काँग्रेसने याचा निषेध करत राज्यात शनिवारी या कायद्यांविरोधात ऑनलाईन मोहीम राबवली.

या ऑनलाईन मोहिमेत शेतकरी त्याचप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: