पंतप्रधान मोदींवर बाळासाहेब थोरात यांचे गंभीर आरोप…

Spread the love

मुंबई | गेल्या सहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य करत आहेत परंतु त्यांनी कोणताही नवीन उपक्रम हाती घेतला नाही. या उलट त्यांनी लाखो लोकांचे रोजगार देणारे उपक्रम आपल्या उद्योगपती मित्रांच्या हातात देत आहेत. अशा प्रकारचे आरोप करत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केले.

भाजप सरकारने त्यांच्या काळात एकही सार्वजनिक उपक्रम केला नाही. मात्र आता खासगी उपक्रम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला .

त्याचबरोबर मोदी सरकारवर थोरातांनी घणाघाती टीका केली व म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळातील लाखो लोकांची रोजगार असलेले उपक्रम मोदी सरकार उद्योगपती मित्रांच्या हातात देत असल्याची टीका केली.

त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी रेल्वे च्या खाजगीकरनाच्या निर्णयावर भाजप सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत .त्याचबरोबर रेल्वे ही गरीबांची जीवनरेषा आहे किमान ती तरी त्यांच्यापासून हिरावून घेतली जाऊ नये, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला सुनावले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.