पश्चिम बंगालमध्ये अंफाण वादळात उध्वस्त झालेल्या दलितवस्त्यांचे पुनर्वसन करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आवाहन

0
7

मुंबई दि. 2 – अंफाण वादळात पश्चिम बंगाल मधील अनेक जिल्ह्यांत मोठी हानी झाली आहे. त्यात सुंदरबन ; चोबिस परगणा ; मेदनापूर ; हुगळी; हावराह; नदिया या जिल्ह्यांत दलित वस्ती असणारी गावे अंफाण वादळात उध्वस्त झाली आहेत. त्या गावांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही या गावांतील दलित वस्त्यांना मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल च्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगाल सरकार ने त्वरित तेथील दलितवस्त्यांकचेही पुनर्वसन करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना ना रामदास आठवले लवकर पत्र पाठविणार आहेत.

पश्चिम बंगाल च्या सुंदरबन जिल्ह्यातील बशरा; होरीन हुडा; कालिबारी; चांदीबारी; मोहोनपूर; मल्लिकघेरी; या गावांचे येथील विद्याधारी नदीचे अनेक ठिकाणचे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे.या गावांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पश्चिम बंगाल प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक यांनी भेट देऊन या गावांतील दलित वस्त्या अंफाण वादळात पूर्ण उध्वस्त झाल्याची पाहणी केली. त्याबाबत चा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आणि केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांना पाठवीला आहे.येथील दलित वस्त्यांना मदत मिळत नसल्याची व ममता बॅनर्जी सरकार गावांतील दलित वस्त्यांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार रिपाइं( आठवले) प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक यांनी केली आहे. त्यानुसार लवकरच ना रामदास आठवले पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना पत्र लिहून अंफाण वादळात उध्वस्त गावांना त्यांतील दलित वस्त्यांना त्वरित मदत करण्याची मागणी करणार आहेत.

इथे हि वाचा
ATKT बदल काय म्हणाले उदय सामंत
‘वंचित’च्यावतीने सोलापुरात कम्युनिटी हॉस्पिटलची सुरुवात!
पिंपळाच्या झाडाला जीवदान