मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोना या जीवघेण्या व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. पण आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मिशन बिगिन अगेननुसार मुंबईतील सर्व सामान्यांचे जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी बेस्टने देखील कंबर कसली असून उद्यापासून बेस्टच्या बस सर्वसामान्यांसाठी धावण्यास सुरुवात होणार आहे.
लॉकडाऊन च्या काळात बेस्ट फक्त सरकारी कर्मचारी व आरोग्य सेविका अत्यावश्यक सेवा देणार्यांना यांनाच उपलब्ध होती.
आता सर्वसामान्य जनतेला सुध्दा बेस्ट उपलब्ध होईल. तर प्रत्येकी सीट वर एक जण तर उभे राहून फक्त 5 प्रवाशी प्रवास करतील.
सोमवारी २ हजार ३०० फेर्या होणार असून त्यानंतर त्या साडेतीन हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
इथे हि वाचा
उद्यपासून मुंबई मधील बेस्ट बस सेवा जनतेसाठी धावणार
अरविंद बंसोड मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहआरोपी करा !
सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न; राऊतांचा गंभीर आरोप