राम मंदिराच्या भूमीपुजनाचा मुहूर्त ठरला!

नवी दिल्ली |अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजनाच्या मुहूर्त ठरलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

15 ऑगस्ट या तारखेवर पंतप्रधान कार्यालयातून सहमती झाल्याची माहिती मिळालेली आहे. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार की पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन भूमिपूजन करणार यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही.

राम मंदिराच्या भूमीपुजनानंतर साडे तीन वर्षात मंदिराचं संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिराच्या उभारणी प्रक्रियेमध्ये अडथळा येत होता परंतु येत्या पाच ऑगस्ट रोजी उद्घाटन पार पडणार आहे.

केंद्र सरकारकडून अयोध्येमध्ये भव्य राम उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची उभारणी करण्यात आलेली असून यामध्ये 15 सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

इथे ही वाचा

धुळ्यात मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं… मृत महिलेच्या अंगावरील 80 हजार रूपयांचे दागिने गायब!

मोदी सरकारची योजना दरमहा 55 रुपये जमा करून प्रत्येक महिन्याला मिळवा 3000, योजनेचा 39 हजार जणांनी घेतला फायदा

मागासवर्गीय विद्यार्थी अनुदाना पासून वंचित, निधी अन्य ठिकणी वळविला – राजेंद्र पातोडे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: