धनुष्यबाण’ नव्हे निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलं ‘बिस्कीट’; शिवसेना म्हणते…

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह दिलं आहे, मात्र शिवसेनेने या चिन्हावर नापसंती व्यक्त केली आहे.

सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जेडीयूने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप नोंदवला होता. जेडीयूचे चिन्ह बाण असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो, असं जेडीयूने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. हा आक्षेप आयोगानं ग्राह्य धरला आहे.

दरम्यान, शिवसेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस किंवा बॅट यापैकी एक चिन्ह देण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने त्यांना बॅट दिली आहे. शिवसेनेने आक्षेप घेणारं पत्र लिहिल्यानंतर आता याप्रकरणात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: