शरद पवार हॅट्स ऑफ!, आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं- पंकजा मुंडे

पुणे | अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार दौऱ्यावर गेले होते. त्याचप्रमाणे कोरोना काळातही त्यांनी विविध शहरांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केलीये. तर पवार यांच्या या कामाबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आदर व्यक्त केलाय.

आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटलं अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय.

यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट केलंय. त्या म्हणाल्यात, शरद पवार हॅट्स ऑफ… कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळं जरी असलं तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचं मुंडे साहेबानी शिकवलं आहे.

ऊसतोड कामगारांच्या संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या.

Related Posts

%d bloggers like this: