अद्याप भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला नाही-एकनाथ खडसे

मुंबई , 20 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे . एवढंच नाहीतर 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी माहितीही समोर आली आहे . पण , आता दस्तरखुद्द एकनाथ खडसे यांनी ‘ अजून असा कोणताही निरोप आला नाही ‘ , असा खुलासा केला आहे . एकनाथ खडसे यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली आहे . राष्ट्रवादीमध्ये 22 ऑक्टोबर रोजी प्रवेश होणार अशी चर्चा सुरू आहे . मात्र , अद्याप मला याबाबत काहीही सांगितलेलं नाही . राष्ट्रवादीकडून अजून कुठलाही निरोप नाही . याबद्दल अजून चर्चा व्हायची बाकी आहे , असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले . त्याचबरोबर मी अद्याप भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला नाही , असंही एकनाथ खडसे यांनी सांगितले .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: