विविध समाजातील शेकडो महिलांचा वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये जाहिर प्रवेश

मुंबई- १९ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन महिला आघाडी उत्तर मध्यच्या जिल्हा अध्यक्षा कृतिकाताई जाधव ह्यांच्या नेतृत्वात तसेच आदरणीय सीमाताई तांबे ह्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ह्यात विविध समाजातील स्रीयांनी वंचित बहुजन महिला आघाडी मध्ये जाहिर प्रवेश केला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी जबाबदारी घेतलेल्या सर्व पदाधिका-यांचे मुंबई प्रदेश कमिटिकडून अभिनंदन आणि धन्यवाद.
पार पडलेल्या बैठकीत मार्गदर्शन करणारे उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष संतोष दादा आमुलगे, चांदिवली तालुका अध्यक्ष दत्ता दादा निकम, महिला जिल्हा संघटक चंद्रकलाताई नागटिळक, तालुका कार्यकारिणी वरील कल्पना शिंदे तसेच पक्ष प्रवेशासाठी जागा उपलब्ध करून देणारे वंचित बहुजन आघाडी उत्तर मध्य जिल्ह्यातील धडाडीचे कार्यकर्ते गौतम दादा हराळ ह्या सर्वांना त्यांच्या पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

मुंबई प्रदेश कमिटिवरील मुंबई प्रदेश अध्यक्षा सीमाताई तांबे, मुंबई प्रदेश महासचिव शुभलक्ष्मीताई सावंत, सचिव अस्मिताताई जाधव, मुंबई प्रदेश आयटि प्रमुख स्नेहलताई सोहनी, मुंबई प्रदेश संघटक नुतनताई काटे, सदस्य प्रज्ञाताई रोकडे, सदस्य सोनलताई अंकुश, सदस्य निशागंधा कदम ह्यांकडून कृतिका जाधव ह्यांना पुढिल वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: