देशभरातील indane घरगुती गॅसच्या ग्राहकांना , LPG सिलेंडर बुक करण्यासाठी या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल .

देशातील सर्वात मोठी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी I0C , ( India Oil Corporation ) इंडेन नावाने गॅस एजेन्सी डिस्ट्रिब्यूशन सर्व्हिस चालवते . घरगुती सिलेंडर मोबाईल नंबरद्वारे बुकिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे . जर तुम्ही इंडेन ग्राहक असाल , तर आजपासून जुन्या नंबरवर गॅस बुक करता येणार नाही . इंडेनने आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या रडिस्टर्ड मोबाईल नंबरवर गॅस बुक करण्यासाठी , नवा नंबर जारी केला आहे . आता नव्या नंबरनुसार , इंडेन गॅस ग्राहकांना सिलेंडर बुक करावा लागणार आहे . इंडियन ऑईलकडून जारी करण्यात आलेल्या या नंबरचा वापर इंडेनचे देशभरातील ग्राहक SMS द्वारे , गॅस बुकिंगसाठी करू शकणार आहेत .

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार , आता देशभरातील indane घरगुती गॅसच्या ग्राहकांना , LPG सिलेंडर बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: