बार्टी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप जाहिरात काढण्याबाबत नॅशनल स्टुडंट्स युनियन चे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

मुंबई:महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुसूचित जातीच्या समाजातील विद्यार्थांच्या शैक्षनिक उन्नती आणि विकाससाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणी प्रशिक्षण संस्था पुणे ची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात अनेक वेगवेगळे उपक्रम आणी प्रकल्प राबविले जात आहेत. कारण १९१३ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च अभ्यासांसाठी न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात ऐतिहासिक प्रवास केला. या कृतज्ञतेच्या स्मरणार्थ, बार्टीने २०१३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप (बीएएनआरएफ) सुरू केली. यामध्ये नियमित आणि पूर्णवेळ एम. फिल आणि पीएचडीला प्रवेश घेवून अभ्यास करू इच्छिनाऱ्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (एससी) पदव्युत्तर पदवीधारकांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. जेणेकरून अनेक होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळाल्यास त्यांचे सामाजिक न्याय व इतर सामाजिक प्रश्नाबाबत संशोधन करण्यास संधी उपलब्ध होते आणि अनेक संशोधक निर्माण होण्यास मदत होते.

परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणी प्रशिक्षण संस्था पुणे संस्थेने सन २०१९ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप (बीएएनआरएफ) जाहिरात न काढल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थांना याचा फटका बसत आहे, त्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या पत्राद्वारे नॅशनल स्टुडंट्स युनियन तर्फे विनंती करण्यात आली की, संबधित अधिकारी यांना आदेशिक करून लवकरात लवकर बीएएनआरएफ जाहिरात काढण्यास सांगावे जेणेकरून यापुढे कोणत्याही विद्यार्थांचे नुकसान होणार नाही व विद्यार्थांना न्याय मिळेल आणी या योजनेचे उद्दिष्ट साध्य होईल असा आशावाद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादाराव नांगरे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून केला आहे.
या निवेदनावर उपाध्यक्ष सुमेध रामटेके,महासचिव कमलेश उमाळे,कार्याध्यक्ष गिरीश मानव,सहसचिव राहुल तांबे,संघटक निखिल वाहने,सल्लागार सुनील शिरीषकर व आय टी विभागाचे प्रमुख राहुल ठोके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या निवेदनाची प्रत बार्टी चे महासंचालक,समाज कल्याण विभाग पुणे चे आयुक्त तसेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे पाठविण्यात आले आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: