प्रियंका गांधींना केंद्राची नोटीस, एका महिन्याच्या आत बंगला सोडा…

0
5

नवी दिल्ली | केंद्र सरकार कडून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला खाली करावा अशी नोटीस देण्यात आली. याबद्दलच कॉंग्रेसकडून सांगण्यात आलेले आहे की,सरकारचा हा सूडाचा डाव आहे. मात्र प्रियांका गांधी भाजपचा गढ समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात शिफ्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लखनऊ मध्ये असलेल्या इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचे कौल हाउस असल्याची माहिती मिळाली आहे.प्रियंका गांधी कौल हाऊस मध्ये शिफ्ट होऊ शकतात.

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात आपला जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती समोर आली आहे.प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची धुरा आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या त्या प्रभारी देखील आहेत.

ही बाब काँग्रेस पक्षासाठी अत्यंत सकारात्मक आहे तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे यूपीतील येणे जाणे सध्या कमी झाले होते. व त्याचबरोबर सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी लखनऊ मधून सक्रिय होतील, दिल्लीतून नाही अशी माहिती मिळाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here