मुंबई | राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयानुसार, आता पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार आहेत. 9 ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे.
9 ऑक्टोबरपासून दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावतील.