मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय पाहता 2024च्या निवडणुकीत भाजप 400चा आकडा क्रॉस करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कणकवलीमध्ये ते बोलत होते.
संपूर्ण देशाने कृषी कायद्यांचे समर्थन केलं आहे. हे कायदे सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र विरोधकांना आता जाग आली आहे. राज्यातली मूठभर लोकांच्या साथीने देशातीव शेतकऱ्यांचं आंदोलन केलं जात असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर विकण्याचा कायदा काँग्रेसने तीन वेळा आणण्याचा प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांना फसवले जात असल्याचा आरोप ते करत आहेत असं म्हणत शेतकऱ्यांना वेडे समजता का?, असा सवाल पाटलांनी विरोधकांना केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी हिताचे कायदे केले. त्यामुळेच त्यांना विरोध होत असल्याचं पाटील म्हणाले.