चीन कडून भारतीय सैन्याचंं कौतुक म्हणाले…’भारत या बाबतीत जगात अव्वल

0
6

बीजिंग | भारताकडे सर्वात मोठं आणि उंचावरील युद्धांसाठी प्रशिक्षण देण्यात आलेलं अनुभवी सैन्य आहे. अशा उंच ठिकाणी लढाई लढताना आवश्यक असणारे गिर्यारोहणाचे कौशल्य प्रत्येक भारतीय सैनिकाकडे आहे, असं मत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी उपकरणे तयार करणार्‍या कंपनीच्या अधिकाऱ्याने आणि चीनशी संबंधित लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

पठार आणि पर्वतरांगा असा दोन्ही ठिकाणी लढाई करु शकणारा सध्या जगातील सर्वात मोठा आणि अनुभवी सैन्य हे अमेरिका, रशिया किंवा कोणत्याही युरोपियन देशांकडून नसून ते भारताकडे आहे, असं ‘मॉडर्न वेपनरी’ मासिकाचे ज्येष्ठ संपादक हुआंग गुओझी यांनी आपल्या लेखात म्हटलंय.

भारतीय लष्करातील प्रत्येक सैनिकाला गिर्यारोहणचे कौशल्य अवगत असणे बंधनकारक आहे. इतकच नाही तर भारत गरज पडल्यास खासगी गिर्यारोहक तसेच शिकावू गिर्यारोहकांचीही मदत घेऊ शकतो, असं गुओझी यांनी म्हटलं आहे.

भारत आणि चीनमध्ये लडाखच्या सीमेरेषेजवळ मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा लेख छापण्यात आला आहे.

इथे हि वाचा

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले दि.12 जून रोजी करणार निसर्ग वादळग्रस्त कोकणचा पाहणी दौरा

लोणार_सरोवराचे_पाणी_झाले_गुलाबी

निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे मोठे निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here