मागील काही दिवसांपासून चीन अमेरिका हा संघर्ष चाललेला आपण बघत आहोत. अश्यातच आता चीन भारताला धमकी देणे सुरू आहेच.एकीकडे भारत आणि चीनदरम्यान सीमेवरीव तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे चीन आपल्या सरकारी वृत्तपत्रातून भारतविरोधी गरळ ओकताना दिसत आहे. दरम्यान, भारत आपल्या धोरणांचं पालन करावं आणि अमेरिकेपासून दूर राहावं, असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे. “चीनचा विरोध करण्यासाठी भारतानं अमेरिकेला साथ दिली तर चीन आपल्या हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, मग ते राजकीय असेल किंवा आर्थिक,” असंही ग्लोबल टाईम्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.
“भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्या परस्पर सहमतीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आली आहेत,” असं ग्लोबल टाईम्सनं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे
तसंच दोन्ही देशांमधील तणावाचं वातावरण कमी होत असल्याच्या काही विश्लेषकांच्या वक्तव्यांचीदेखील यात प्रशंसा करण्यात आली आहे.