महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, असं आठवले यांचं म्हणणं आहे.

रामदास आठवले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. पण, हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही.

राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल या मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी मी सहमत नाही. मुळात सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे, त्यामुळे एक दिवस भूकंप होईल, असं वक्तव्य आठवले यांनी केलंय.

त्याचप्रमाणे अभिनेत्री कंगणा राणावतच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन विषय संपवावा, असंही आठवले यांनी सांगितलं आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: