मुंबई : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत (Maharashtra Lockdown 5 guidelines) वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच आपली नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली आहे. यात नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे.
कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार
केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत.
पहिला टप्यात 8 जूनपासून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडले जातील. मात्र यासाठी नियम आणि अटी लागू असतील.
दुसच्या टप्यात मध्ये शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. मात्र त्याबाबत राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार आहे, मात्र त्याबाबत राज्य सरकारांनीच ठरवायचं आहे. त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही हे जुलैमध्येच ठरेल..
तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
अश्या प्रकारे विविध टप्याने लॉकडाऊन उघडणार आहे.
परिस्थिती नुसार वेगवेगळ्या झोन मधील परवानगी असेल
इथे हि वाचा
धक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास
ठाण्यात रुग्णालयांचा अॅडमिट करुन घेण्यास नकार, गर्भवती महिलेचा रिक्षामध्ये मृत्यू
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही – शिक्षण विभाग