भारतात कोरोना ने तोडला रेकॉर्ड, गेल्या 24 तासात धक्कादायक आकडेवारी…..

0
4

नवी दिल्ली  | कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशातल्या सर्वच भागांमध्ये वाढत चालला आहे.देशात अनलॉक केल्यानंतर ग्रीन झोन मध्ये असणारे जिल्हे रेड झोन मध्ये जाऊ लागले आहेत.,कारण अनलॉक केल्यामुळे व्यवहार वाढल्याने माणसांची वर्दळ वाढू लागली ,त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ बघायला मिळत आहे.

गेल्या 24 तासांत देशात 18 हजार 552 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 05 लाख 08 हजार 953 इतकी संख्या आता भारतात एकूण कोरोना बाधित रुग्णांची झाली आहे. तर दुर्दैवाने 384 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 1 लाख 97 हजार कोरोणा बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 लाख 95 हजार 881 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांपैकी ॲक्टिव रुग्णांची संख्या कमी आहे.

महाराष्ट्रात कोरोणा चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 5 हजार 24 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, महाराष्ट्रात रुग्ण संख्येत आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.

इथे हि वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

16 वर्षीय टिक टॉक स्टार ने केली आत्महत्या….

राजेश टोपे यांनी दिली कोरोना औषधांबाबत गुड न्यूज….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here