मुंबई | कृष्णकुंज या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थाना पर्यंत कोरोणा पोहोचला आहे. राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करणाऱ्या दोन व्यक्तीं कोरोणा पॉझिटिव्ह आढळले.
राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्ये कोरोणा ची लक्षण आढळून आल्यास त्यांची कोरोणा चाचणी केली गेली, तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. त्या व्यक्तींवर आता मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याआधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षारक्षक कोरोणा पॉझिटिव्ह आढळले होते व यामध्ये तीन सुरक्षारक्षकांना कोरोणाची लागण झाली होती. त्यानंतर आता घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोणाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात अनलॉक केल्यामुळे लॉक डाऊन चे नियम थिशिल झाले आहेत. व राज्यात कोरोणा चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. काल तर एकाच दिवशी पाच हजार रुग्ण कोरोणा पॉझिटिव्ह आढळले आहेत.
इथे हि वाचा
16 वर्षीय टिक टॉक स्टार ने केली आत्महत्या….
राजेश टोपे यांनी दिली कोरोना औषधांबाबत गुड न्यूज….
इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!