भारतात कोरोनाचं थैमान सुरूच, मागच्या 24 तासांत….
नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात कारोनाने हाहाकार केला आहे .तसेच भारताची आकडेवारी आता रशियाला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यापासून संख्येमध्ये भलतीच वाढ होताना दिसत आहे. तसेच गेल्या चोवीस तासात 24 हजार 879 कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले आहे .
केंद्रीय आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे की, आतापर्यंत 7 लाख 67 हजार 296 इतकी भारतातली कोरोना बाधितांची संख्या झालेली आहे .तसेच गेल्या चोवीस तासांमध्ये 487 दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागलेल्या आहे.
देशात सध्या 2 लाख 69 हजार 989 एवढ्या ॲक्टिव केसेस आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 4 लाख 76 हजार 378 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा दिलेल्या रुग्णांच्या संख्या जास्त आहे. त्याचबरोबर दिलासादायक म्हणजे भारताचा रिकवरी रेट 60 टक्क्यांच्या वरती गेला आहे.
संपूर्ण भारतात सगळ्यात जास्त कोरोणाचा प्रकोप महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.राज्यात बुधवारी कोरोणाच्या 6 हजार 303 नवीन रुग्ण आढळून आले असून सध्या राज्यात 91 हजार 65 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून मिळाली आहे .
इथे ही वाचा
या नेत्यांनी दिला इशारा… इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घ्या…
या नेत्यांनी दिला इशारा… इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घ्या…
पुणे शहरात काल दिवसभरात कोरोना रूग्णांमध्ये उच्चांकी वाढ, आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला!