पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या या धडाकेबाज नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी, संपूर्ण शहरात हळहळ!

0
4

पिंपरी चिंचववड |   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक तसंच महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचं कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे .पिंपरी चिंचवडच्या एका खासजी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दत्ता साने यांना 25 जून रोजी कोरोना संसर्गाची लागण झाली होती .त्याच बरोबर त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांनी नऊ दिवस कोरोनावर उपचार केले .परंतु कोरोना बरोबरीची झुंज अपयशी ठरली.. दत्ता साने यांच्या पाश्चात त्यांची आई, पत्नी हर्षदा, मुलगा यश आणि एक कन्या तसंच दोन भाऊ आहेत.

दत्ता साने यांना कोरोणाची लागण झाली असतानाच निमोनियाची सुद्धा लागण झाल्याची माहिती समोर आली. म्हणून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांनी आज श्वास सोडला.परंतु त्यांच्या निधनाने संपूर्ण पुण्यात तसंच पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे

दत्ता साने हे नेहमी समाजोपयोगी काम करत असायचे. लॉक डाऊन मध्ये त्यांनी अन्न वाटप तसेच गरजूंना मदत करणे यावर त्यांचा लॉक डाऊन च्या काळात बराच भर होता. तसेच,दत्ता साने आपल्या धडकेबाज कामांसाठी पिंपरी चिंचवडमध्ये ओळखले जायचे एक भला माणुस कोरोनाने हिरावून नेल्याची भावना राजकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे.

इथे ही वाचा

महापौर बंगला ठाकरे कुटुंब प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखा वापरतात.. निलेश राणे.

मुख्यमंत्री गाडीतून अन् अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून… त्याच्या नाशिक दौऱ्याची चौकशी करा”

घाबरू नका… लोकसंख्या वाढत असली तरी ही राज्याच्या दृष्टीने सकारात्मक बातमी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here