नवी दिल्ली | काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कडून मागणी करण्यात आली आहे की,काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात यावं, पक्षातील अन्य नेत्यांचाही या मागणीला दुजोरा असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रियंका गांधी आधी च्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात चांगल्या सक्रिय आहेत त्याचबरोबर प्रियांका गांधी या सध्या काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत त्याचबरोबर, उत्तर प्रदेशाच्या त्या प्रभारी देखील आहेत.
प्रियांका गांधी या लखनऊमध्ये र राहायला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे ,कारण प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे.परंतु प्रियंका गांधी यांचीही उत्तर प्रदेशात राहण्याची इच्छा आहे असं म्हटलं जात आहे.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात आपल्या जम बसवला असल्यामुळे सध्या सत्ताधारी योगी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते असं बोललं जात आहे. त्याचबरोबर प्रियांका गांधी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी घोषित करावा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे .यामुळे युपीच्या राजकीय पटलावर बरीच खळबळ माजण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
इथे ही वाचा
CA परीक्षेबाबत निर्णयाची शक्यता….
भाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”
रुग्णालयात दाखल असलेल्या लडाखमधील जखमी जवानां च्या भेटीसाठी नरेंद्र मोदी…