कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिक तर आहेतच मात्र यामधून सिने कलाकार, पोलिस, आरोग्य कर्मचारी हे देखील वाचले नाहीत. अशात गेल्या काही दिवसात आपल्या समोर बातम्या आल्यात त्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांना झालेल्या कोरोनाबाबत. सुदैवाने जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण हे दोघेही मंत्री कोरोनमुक्त झालेत. मंत्री, नेते मंडळी, राजकारणी यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असतो. म्हणून याना देखील कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे..
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.