मुंबई | कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्यामुळे शाळा अजूनही चालू झालेल्या नाहीत तरीसुद्धा ऑनलाईन अभ्यासाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची गरज पाहता वंचित बहुजन आघाडी अनुशक्तीनगरच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
चेंबूर, मानखुर्द, पांजरापोळ या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले. राज्यभरात लॉक डाऊन असल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे .अशाच परिस्थितीत मुलांच्या अभ्यासाला ऑनलाइन सुरुवात सुद्धा झालेली आहे. लॉक डाऊन असल्यामुळे नोकऱ्या गेल्या, काम बंद झाले तसेच आणि अन्नधान्य सुद्धा नाही अनेक कुटुंबांवर बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे.
ऑनलाईन अभ्यास सुरू झाल्यामुळे अभ्यासा साठी लागणारे साहित्य आणायचे कुठून असा मोठा प्रश्न पालकांना पडला होता व ही अडचण लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीच्या अनुशक्तीनगर तालुक्याच्यावतीने वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
येत्या काही दिवसांमध्ये गरजेनुसार स्कूल बॅग पेन व तसेच पेन्सिल स व तसेच इतर अनेक साहित्य सुद्धा वंचितांच्या कार्यकर्त्यांकडून देणार येणार असल्याचं सांगितलं.मानखुर्द, महाराष्ट्र नगर, पांजरापोळ, वाशी नाका, भारत नगर, मुकुंद नगर या परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.