डॉ.हर्षदीप कांबळे सर,(IAS) यांच्या सहाय्यता मधून ठाकरवाडी, खेड,पुणे येथील आदिवासी 60 कुटुंबांना धान्य वाटप!

1
4

शिरोली येथिल “ठाकर”वस्तीतील 60 कुटुंबांना अन्नधान्य वाटप . . .

कोविड 19 तथा कोरोना विषाणु या संसर्गजन्य परिस्थितीत लाँकडाऊन असल्याने संपुर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे.जिवनाश्यक सेवा सोडल्यास सगळे व्यवहार हे ठप्प झाल्यामुळे अनेक हातावर पोट असणार्या कुटंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
दुर्बल घटकांसाठी लाँकडाऊनच्या काळात आत्तापर्यंत 10000 च्या वर लोकांना अन्नधान्य पोहचवणारे मा .हर्षदीप कांबळे साहेब (IAS ) यांच्या सहकार्यातुन आज खेड तालुक्यातील शिरोली या गावातील वाड्यावस्त्यांवर राहणार्या “ठाकर” समाजातील 60 कुंटुंबाना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
ग्रामिण भागातील अतिशय दुर्लक्षित असलेला “ठाकर” समाज होय.लाँकडाऊन च्या काळात याही समाजावर रोजगारअभावी उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.अश्यातच प्रशासनाने या समाजाच्या मुलभुत प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे.अश्यावेळी समाजिक बांधिलकी जपुन मा.कपिल सरोदे यांच्या माध्यमातुन तसेच रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.हरेशभाई देखणे यांच्या पुढाकाराने 60 कुटुंब‍ांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
गहु तांदुळ, तेल ,साखर,चहापत्ती ,डाळ इ. जीवणाश्यक वस्तुंचे किट सर्व ठाकर समाजातील कुंटुंबांला देण्यात आले.
यावेळी मा.कपिल सरोदे (अभ्यासक),मा.हरेशभाई देखणे महाराष्ट्र प्रदेश सचिव,रिपाइं, मा.संगिता केदारी (संरपंच ,शिरोली) मा.सदाशिव आढाव(ग्राम विकास अधिकारी ,शिरोली) मा.निर्मला देखणे (सचिव-निर्मिका फांऊडेशन ).मा.गौतम कदम (अध्यक्ष – द रिपब्लिकन ) मा.उमेश खत्री,मा.संपत केदारी इ. उपस्थित होते.

इथे हि वाचा

शिवाचार्यांच्या मारेक-यांना ताबडतोब अटक न झाल्यास वंचितच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडणार – राजेंद्र पातोडे

#महाराष्ट्रानेआणखीनएकहिरागमावला 😥😢 वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निलेश जोंधळे यांचे थोड्यावेळापूर्वी कोरोना आजाराने निधन झाले.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

निलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध..! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने आहोत-प्रकाश आंबेडकर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here