मुंबई | महाराष्ट्र आरोग्य यंत्रणेने कोरोणाला आटोक्यात आणण्यासाठी पुकारलेल्या युद्धाला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. दररोज देशभरात नवीन कोरोणा बाधित रुग्ण सापडले असले तरीही ,आता कोरोणा पेशंट ला डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
शुक्रवारी म्हणजेच काल 3515 त्यांना घरी सोडण्यात आले होते तसेच,गुरूवारी 8 हजारांपेक्षा जास्त अधिक रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता . त्यामुळे ठणठणीत बरे झालेल्यांची एकूण संख्या आता १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे.
त्याचबरोबर कोरोनाला यंत्रणेत आणण्यासाठी नियंत्रणास मोठे यश मिळत आहे .कोरोणाचा रिकवरी रेटमध्ये वाढ होत आहे.राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
संपूर्ण राज्यभरात 8 हजार 381 रुग्णांना दि. २९ मे रोजी एकाच दिवशी घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्ज देन्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचबरोबर गुरुवारी सुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले तसेच शुक्रवारी सुद्धा साडे तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
इथे ही वाचा
पहा…गेल्या 24 तासातील कोरोना बाधितां चा आकडा…
राजेश टोपे यांनी केले भारतात तयार होणाऱ्या लसी बद्दल वक्तव्य.
सी,ए, परीक्षा रद्द – प्रसाद सोनवणे यांच्या मागणीला यश