भाजपला लगीनघाई झालीये पण बायकोच मिळेना, प्रकाश आंबेडकरांची टीका

औरंगाबाद | भाजपला लगीनघाई झालीये… त्यांना जोडीदार हवाय, पण त्यांना तो मिळेना, अशी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र भाजपवर टीकास्त्र सोडलं.

महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून बरीच चर्चा देखील झाली. याच वक्तव्याचा धागा पकडत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर मिश्किल टीका केली.

दुसरीकडे त्यांनी नागरिकांना लॉकडाऊन तोडण्याचं आवाहन केलं. शासनाने जरी आता लॉकडाऊन केलं तरी ते आता मोडा आणि येणाऱ्या 1 तारखेपासून तुमचे व्यवहार सुरू करा, जनजीवन सुरळित करा, असं ते म्हणाले.

ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरी अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं ते म्हणाले. तसंच लॉकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही, असं पुनरूच्चार देखील त्यांनी केला.

इथे ही वाचा

निष्ठावंतांच्या निष्ठा कुचकामी!; नुकतंच राष्ट्रवादीत आलेल्या शिवव्याख्यात्यास ‘विद्यार्थी’चं प्रदेशाध्यक्षपद?

धक्कादायक! बायकोचा मृतदेह ड्रममध्ये भरून हायवे लगतच्या झाडीत फेकून दिला अन…

आधी बेदम मारहाण, नंतर मुंडण करून पाजलं मुत्र, राजस्थानातील संतापजनक घटना!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: