एकनाथ खडसे-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे

0
92

मुंबई |   विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चांगलाच रूद्रावतार धारण केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते पक्षावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे, अशा शब्दात त्यांनी स्वपक्षातल्या नेत्यांवर टीका केली आहे.

भारतीय जनता पार्टीमधील काही व्यक्ती मला जाणीवपूर्वक बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून अशा स्वरूपाचा छळ सुरू आहे. मला वारंवार छळलं जातंय, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.

भाजपमध्ये लोकशाही राहिलेली नाहीये. बहुजन नेत्याला डावलण्याचं काम भाजपमध्ये आहे. पण जर हे असचं चालू राहिलं तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही खडसेंनी दिला.

आजही हजारो कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहे की, कशासाठी पक्षामध्ये राहत आहात. लोकांची भावना बदलत चालली आहे, पण मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी हे सहन करत आलो आहे. पण, यालाही काही मर्यादा आहेत, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

इथे हि वाचा

प्रकाश आंबेडकर-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here