सोलापुर | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा केला व नवीन उमेदवारासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक आल्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाला आहे .नुकतच राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत नाव नोंदणीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांच्याकडून सांगण्यात आले की, या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत व योग्य उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल व त्यातून निवडणूक उमेदवार निवडला जाईल.
दरम्यान, अजिंक्यराणा पाटील यांनी या आधी हे अध्यक्षपद सांभाळले होते.अजिंक्य राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नुकताच राजीनामा दिला. व त्याच बरोबर एक प्रामाणिक राष्ट्रवादी चा कार्यकर्ता म्हणून काम करत राहील असे त्यांनी राणा यांनी सांगितले .
इथे हि वाचा
राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज….
पडळकर यांनी केली रोहित पवार यांच्या वर टीका…रोहित पवारांचं प्रत्युत्तर…
मुंबईकरांच्या चिंतेत वाढ… कोरोणा नंतर या आजाराचा शिरकाव….