‘शेतकरी घरी असते तरी ते मेलेच असते ना’; ‘या’ भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Spread the love

नवी दिल्ली | सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीही सरकारने यावर अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. अशातच भाजप नेते आणि हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. या आंदोलनात आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेनूसार झाला आहे. शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना, असं वादग्रस्त वक्तव्य करत जे. पी. दलाल यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडवली आहे.

जे. पी. दलाल यांनी आंदोलकांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर देशभरातून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. तसंच त्यांनी संपूर्ण आंदोलक शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी जे. पी. दलाल यांनी केली आहे.

दरम्यान, या आंदोलनात आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. तसेच उन्हाळ्यात शेतकरी आंदोलन टिकवण्यासाठी एसी आणि कुलरची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी सरकारने आम्हाला विजेचा पुरवठा करावा, अशी मगणीही राकेश टिकैत यांनी केली आहे.

इथे हि वाचा

“मंत्री झाल्यावर मला कळालं, की त्यासाठी फार अक्कल लागत नाही”

कोरोनामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू!

“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”


Spread the love