पुणे | देशभरात दिवसेंदिवस कोरोचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये तीन ते साडेतीन हजारापर्यंत रुग्ण दिवसाला आढळून येत होते. परंतु ,गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा पाच हजारापर्यंत पोहोचला आहे.अशातच कोरोणा ग्रस्तां चा आकडा हा येत्या दोन महिन्यांमध्ये वाढेल अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
राजेश टोपे म्हणाले, जुलै आणि ऑगस्ट महिन्या मध्ये कोरोणा बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे ,परंतु रुग्ण संख्या वाढण्याची चिंता नाही फक्त मृत्यूदर वाढू नये याची चिंता आहे. तरी आम्ही यावर काम करतो आहे असे ते म्हणाले
त्याचबरोबर राजेश टोपे यांनी सांगितलं की, मुंबई मधली रुग्ण संख्या कमी होऊ शकते, पण मुंबई पुण्यातून काही संशयित राज्यातल्या इतर भागांमध्ये गेल्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर बाधित रुग्णांसाठी सरकारकडून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे बाधित रुग्णांवर महात्मा फुले जण आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील.या सूचना प्रशासनाला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
इथे हि वाचा
सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…
भारतात कोरोना ने तोडला रेकॉर्ड, गेल्या 24 तासात धक्कादायक आकडेवारी…..
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!