जाणून घ्या… इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची नवीन तारीख…

0
6

दिल्ली | कोरोणा च्या पार्श्वभूमीवर 2019 -20 या आर्थिक वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे.नागरिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला गेलेला. आहे.

इन्कम टॅक्स भरण्याची मुदत पुरे पाच महिन्यांनी पुढे ढकलली गेलेली आहे. यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे . इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढवली आहे. ट्विटरद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्याची माहिती शनिवारी इनकम टॅक्स विभागाने दिली.

आयकर विभागाकडून सांगण्यात आलेले आहे की, सध्या कोरोणाच्या परिस्थितीमुळे आम्हाला जाणीव आहे म्हणूनच 2019-20 च्या आर्थिक वर्षाचे इन्कम टॅक्स भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आशा आहे की यामुळे करदात्यांना आर्थिक नियोजनात मदत होईल, अशी माहिती ट्विटरवर आयकर विभागाकडून देण्यात आलेली आहे.

दरम्यान, आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटीआर भरण्याची तारीख यापूर्वीच 31 जुलै 2020 केलीये. त्याचबरोबर 31 मार्च 2021 पर्यंत केंद्रा कडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

इथे ही वाचा

“15 ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल”

पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या या धडाकेबाज नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी, संपूर्ण शहरात हळहळ!

महापौर बंगला ठाकरे कुटुंब प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखा वापरतात.. निलेश राणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here