तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

Spread the love

उत्तर प्रदेश | अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आलेली तांडव वेब सिरीज ही सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी या सिरिजवर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौवमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अनेकांनी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका विशिष्ट भागावर आक्षेप घेतला आहे. हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याप्रकरणी हा एफआयआर भारतातील अॅमेझॉन प्राईमच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकावर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येतं आहे.

सीरिज प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयानंही या कंटेंटबाबत अॅमेझॉन प्राईमला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, याच सीरीजबाबत भाजप नेते राम कदम यांनीदेखील घाटकोपर पोलीस स्थानकात याविरोधात तक्रार दाखल केली होती.


Spread the love