कोणत्या कारणामुळे पाण्यात निर्माण झालेले सजीव जमिनीवर येऊ शकले..?

0
12

सजीव सृष्टी निर्मिती साठी आवश्यक असणारे जैवीक रसायन सर्वप्रथम समुद्री जलाशयातच निर्माण झाले ..
पृथ्वीवर मिथेन , अमोनिया ,हायड्रोजन , बाष्प , ज्वालामुखीय उर्जा , सौरउर्जा , विद्युतलत्तेचा चमचमाट , नैसर्गिक किरणोत्सर्ग ह्यांची एकत्रीत घुसळण सागराच्या भरती – ओहोटीमुळे झाली ..त्यामुळे त्याच पाण्यात या मिश्रणामुळे जैवीक रसायन निर्माण झाले ..याच जैविक रसायनाची सुक्ष्म जीवाणूंची दुसरी पायरी 50 कोटी वर्षांनी निर्माण झाली ..पृथ्वीवर तेंव्हा अॉक्सिजन मुक्त स्वरुपात स्वतंत्र निर्माण झालेला नव्हता ..,सूर्याचे व वैश्विक अल्ट्राव्हायलट किरणांमुळे सजीव पाण्याबाहेर जिवंत राहू शकत नाहीत ..ह्या किरणांपासून बचाव फक्त पाण्यातच होऊ शकतो ,.पाण्यात अॉक्सिजन असतो ..
पाण्यात निर्माण झालेले हे प्रथम सुक्ष्म जीवाणूंनी अॉक्सिजन विरहित प्रकाश संश्लेषणाची ( फोटोसिंथिसिस् ) ची प्रक्रिया विकसित केली ,.त्यामुळे ग्लुकोज निर्मिती शक्य झाली ..हेच ग्युकोज त्यांचे अन्न खाद्य होते ..
ह्यानंतर 50 कोटी वर्षानंतर तिसऱ्या उत्क्रांतीची पायरी निर्माण झाली ..ती म्हणजे ” ब्यु – ग्रिन रंगाची अॉल्गी ” नावाची सुक्ष्म जंतूची जात उत्क्रांत झाली ..ह्या जंतूनी प्रकाश संश्लेषणाचा नवा मार्ग विकसित केला ..या प्रकारामुळे अॉक्सिजन निर्माण झाला ..या प्रक्रियेला ” ऐरोबिक फोटो सिंथेसिस् ” असे नांव आहे .. हा निर्माण झालेला अॉक्सिजन सजीवांसाठी विषारी होता .,त्यामुळे अनेक सजीवांच्या प्रजाती नष्ट झाल्यात ..पण जे सजीव
ह्या अॉक्सिजनशी जुळवून घेऊ शकले ..तेच सजीव जगण्यासाठी सक्षम ठरलेत ..सजीवांनी अॉक्सिजनचा उपयोग चयापचय प्रक्रियेसाठी केला त्यामुळेच प्रचंड उर्जा निर्मिती करणे सजीवांना शक्य झाले ..त्यातून ग्लुकोज निर्मिती विक्रमी स्वरुपात झाली आणी त्यामुळे सजीवांच्या नव्या नव्या प्रजाती निर्माण झाल्यात ,..
ब्यु – ग्रिन आल्गी जंतूमुळेच पाण्यापासून अॉक्सिजन मुक्त प्रमाणात पृथ्वीवर निर्माण झाला..आणी ह्या मुक्त झालेल्या अॉक्सिजनमुळे पृथ्वीवर ओझोरचा थर निर्माण झाला ..ओझोन म्हणजे अॉक्सिजनचा घट्ट थर असतो ..
ह्या ओझोनमुळे अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून सजीवांचे रक्षण शक्य झाले ..त्यामुळे पाण्यात निर्माण झालेले सजीव जमिनीवर येऊ शकले ,.आणी ते उभयचर बनले ..
जैविक रसायन , सुक्ष्ण जीवाणू , शैवाल ,जलचर , उभयचर , वनस्पती , पक्षी , सस्तन प्राणी आणी प्रगत बुध्दिमत्ता असणारा मानवी प्राणी अशा उत्क्रांतीसाठी किमान 4.5 अब्ज वर्ष कालावधी लागला ..
महेन्द्र शेगांवकर
लेणी तत्वज्ञानी व संशोधक

इथे हि वाचा
फोडणी ते अमेरिका
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्वातील एनडीए सरकारवरची सर्व समाज घटकांचा अतूट विश्वास जिंकणारी 6 वर्षे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा विशेष लेख
“जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल” जागतिक पर्यावरण दिवस तसेच वटपौर्णिमा च्या निमित्ताने विशेष ब्लॉग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here