नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर माजी केंद्रिय मंत्री जयराम नरेश यांचा सवाल

नवी दिल्ली |केंद्र सरकारकडून नुकतेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरनाला सुरुवात करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळात या नवीन शैक्षणिक धोरण ला मंजुरी दिली आहे. व गेल्या तीस वर्षांमध्ये शैक्षणिक धोरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे हे आमूलाग्र बदल करणे आता खूपच महत्वाचे होते. नविन शैक्षणिक धोरणावर पूर्व केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संपूर्ण राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम हा अजूनही विद्यापीठाचा आहे की नाही, ही गोष्ट मला अजूनही स्पष्ट झालेली नाही, असा प्रश्न ट्विटरवरून विचारण्यात आलेला आहे.

शिक्षण क्षेत्रात या नविन शैक्षणिक धोरणामुळे मोठे बदल झालेले आहे.पहिल्या टप्प्यात पाच वर्षात प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली आणि दुसरीचे शिक्षण,दुसऱ्या टप्प्यात इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण,तिसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षण आणि उर्वरित टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येईल. प्रथमच पूर्व प्राथमिक शाळांसाठी एनसीईआरटी अभ्यासक्रम ठरवणार आहे.

पाचवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये मातृभाषेतून शिक्षण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच उच्च शिक्षणात सुद्धा मोठे बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना कला आणि विज्ञान या शाखेतील आवडीचे विषय निवडून त्यांना पदवीचे शिक्षण घेता येईल तसेच देशात एकच उच्चशिक्षण नियामक संस्था असेल. असे शैक्षणिक धोरणात माहिती देण्यात आलेली आहे.

इथे ही वाचा

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना होतोय ‘हा’ आजार; वेळीच व्हा सावध

पुण्यातील कर्वेनगरमध्ये नवरा-बायकोची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिलं ‘हे’ कारण

विवस्त्रावस्थेत आढळलेल्या पुण्यातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: