नवी दिल्ली | केंद्र सरकारने मांडलेल्या बजेटनंतर कोणत्या बँकेचं खाजगीकरण होणार? याची चर्चा सुरू झाली होती. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ‘बॅड बॅक’ असा उच्चार केला होता.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक आणि सेन्टरल बँक ऑफ इंडिया या चार बँकेचं खाजगीकरण होवू शकतं. 2021-22 मध्ये या बँका खाजगी होण्याची शक्यता आहे. पण सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
यापैकी फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाची हिस्सेदारी केंद्र सरकार ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या सर्व बँकेत मिळून 1 लाख 22 हजार कर्मचारी काम करतात. बँक ऑफ इंडिया मध्ये सर्वाधिक 50 हजार कर्मचारी आहेत. बँकाच्या खाजगीकरणातून मिळालेल्या महसूलाचा वापर केंद्र सरकार विविध योजना राबवण्याचा विचार करत आहे.
रॉयटर्सच्या या माहितीनंतर बँक ऑफ महाराष्ट्र समवेत इतरही चार बँकेचे शेअर मोठ्या संख्येने वाढले. यात बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर वर्षातील सर्वाधिक 20% ने वाढलेले दिसले. त्यामुळे सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतिक्षा राहिल.
इथे हि वाचा