देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे चार नेते दिल्लीत; अमित शहांची घेतली भेट

नवी दिल्ली | दिल्लीच्या दरबारी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फडणीसांनी भेट घेतली. भाजपचे राज्यातील चार नेते फडनवीस यांच्या सोबत दिल्ली दौऱ्यावर आहेत.

देवेंद्र फडणवीस ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करणार आहेत.

साताऱ्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे नेते फडणवीस यांच्यासोबत आहेत.

फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही भेट घेणार आहेत. राज्यातील साखर उद्योग यावर भाजप नेत्यांची चर्चा होणार आहे. तसेच साखर कारखाने संकटात असल्यामुळे मदत करावी लागेल,अशी मागणी करण्यात येणार असल्याचे कळाले आहे.

इथे ही वाचा

वीस वर्षीय तरुणीने कोल्हापुरात घेतला गळफास…

माझा देव आणला!; ‘त्या’ भेटवस्तूने खासदार उदयनराजे भारावले

“याच वेगानं संसर्ग होत राहिला तर १० ॲागस्टपर्यंत देशात २० लाख लोक कोरोबाधित असतील”

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: