सर्वाना प्रचलित असलेला चिंचपोकळी चा चिंतामणी गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करून तसेच सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता.आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी आणि गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे…
याबद्दल माहिती मूर्तिकार यांनी दिली चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन होणारा सोहळा रद्द करून काही पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत योग्य ते अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर न करता
जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.
इथे हि वाचा
१५ जून २०२० पासून ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता..
आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे
केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी : मंत्री छगन भुजबळ