नाशिक | नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणार घटना घडली आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात ही संतापजनक घटना घडली आहे. शेजाऱ्यांनीच बलात्कार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
आठवडाभरापूर्वी सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आईने विश्वासात घेवून मुलीची विचारपूस केली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, पीडितेचे आई-वडील मजुरी करतात. आई-वडील घरात नसताना हे सर्व घडल्याचं सांगण्यात आलं आहे. संध्याकाळी शोधाशोध केल्यावर मुलगी अत्यंत भयभयीत अवस्थेत सापडली.