घरीच नियमांत राहून लग्न लावा अन्यथा कारवाई करण्यात येईल :- आयुक्त.तुकाराम मुंढे

0
2

नागपूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लग्न सभारंभ केवळ 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली आहे. पण लग्न सोहळा हा सभागृह किंवा लॉनमध्ये न करता घरी करा, असे आदेश नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.

सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेकांनी आपल्या लग्नासाठी हॉलस बुक केले होते. पण सध्या कोरोना चा पादुर्भाव वाढत असल्याने कोणीही सभागृह किव्हा हॉल वर लग्न सोहळा लावणार नाही आणि जर लग्न सोहळे लावण्यात आले तर कायदेशीर कारवाई करा. असे आदेश महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

नागपूर महापालिकेने एक परिपत्रक काढून हॉल आणि सभागृहात लग्न करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच लग्न हे घरीच जास्तीत जास्त 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत करता येणार आहे. विशेष म्हणजे जर घरी लग्नकार्य करताना नियमांचं उल्लंघन झालं, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढेंनी दिला.

इथे हि वाचा

नागपूर- ऑटोचालकांना आर्थीक मदत मिळावी

अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या – प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here