चांगली बातमी ….लदाख मधून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार…

0
6

नवी दिल्ली | भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे की,सोमवारी भारतीय लष्कराने भारत आणि चीन यांच्यात कमांडर स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. या चर्चेदरम्यान चीन सैन्य मागे घेण्याचं दोन्ही मत एकमत आहे. सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा झाली असून दोन्ही बाजू यांची अंमलबजावणी करतील,

सोमवारी भारत आणि चीन मध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक चीनच्या हद्दीतील मोल्डो भागात झाली. या बैठकीमध्ये काही चर्चा झाल्यानंतर चीन आणि भारत दोन्ही आपले सैन्य मागे घेण्यात तयार झाले आहेत व भारत आणि चीन यांच्यात एकमत झालं आहे असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे .

भारत आणि चीन यांच्यात ५ मे रोजी लडाखमध्ये आमनेसामने लढाई झाल्यामुळे चीन आणि भारत मध्ये संपूर्ण तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे कमांडर अधिकाऱ्यांनी याबाबत बैठकही बोलावली होती या बैठकीमध्ये सीमेवरून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एक जून रोजी गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य चीनने निर्णयाची अंमलबजावणी केली का नाही हे पाहण्यासाठी गेले होते तर पोस्टर हटवण्यास सांगितल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.यामुळे चीन आणि भारत मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले व व या तणावाबाबत हा तणाव कमी करण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात आली होती.

इथे हि वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय… हजारो भारतीयांसाठी अमेरिकेची दार बंद…

एकामागोमाग 18 जन कोरोना बाधित…..काँग्रेस आमदाराच्या घरी कोरोना ने केला कहर..

“मोदींचं अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली जातीये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here