सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला”

0
6

मुंबई | भारताने चीन विरोधी मोठे पाऊल उचलून चीनच्या 59 वर बंदी घातली आहे. भारताने हे पाऊल उचलल्याचे कारण डेटा आणि गोपनीयतेच्या समस्यांमुळे असल्याचं बोललं जात आहे. चीन विरोधी लढाईत सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करण्यात आली.

सामनातील अग्रलेखात लिहीलं आहे की, गुप्तचर यंत्रणांनी सरकारला कळवले की चीनच्या प्रत्येक कंपनीला स्वतःकडे असलेला संपूर्ण डेटा चिनी सरकारला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे चिनीगुप्तचर यंत्रणा आणि चिनी लष्कर या डेटा चा वापर करून हिंदुस्तान विरोधात करू शकतो . तसेच आतापर्यंतची देशाची गोपनीय माहिती चिनी सरकारकडे आहे, असे सुद्धा माहिती मिळाली आहे.

सरकारला आता जाग आली .तरीही आता झालं ते झालं गंगेला मिळालं, यात जनतेचा रेटा आहे. त्यातून चिनी ॲप वर बंदी आणली गेलेली आहे. सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला डिजिटल माध्यमातून घेण्यात आला असे म्हणत सरकारवर टीका केली जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षे साठी सरकारने चिनी ॲप्स वर बंदी आणली राष्ट्रीय सुरक्षेला चिनी ॲप्स पासून धोका होता परंतु इतके वर्ष हे चिनी ॲप सुरू होते ,मग इतके वर्ष सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर केला जात आहे परंतु आता यावर सरकारची भूमिका काय असेल याकडे सवाल उठला आहे.

इथे हि वाचा

राजेश टोपे -आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईकरांनो…सलूनमध्ये चाललाय?, तर आधी ‘ही’ नियमावली जरूर वाचा…

अक्षय कुमार -मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here