मुंबई | आज डॉक्टर डे असल्यामुळे आजच्या दिनाचे औचित्य करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योद्धे बनुन लढत असलेल्या डॉक्टरांचे कौतुक करत ट्विटरवर मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांसाठी खास ट्विट केले आहे. व डॉक्टरांप्रती कृतज्ञता ची भावना व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त करत वचन सुद्धा दिले की.जे डॉक्टर्स आपल्यासाठी योद्धे बनून लढत आहेत, त्यांचे मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यासाठी जी लढाई लढत आहेत, त्यात आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला सहकार्य करत आहोत आणि करू, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बरोबरच दुसरीकडे राजेश टोपे यांनी सुद्धा डॉक्टरांप्रती भावना व्यक्त करत पत्र लिहिले आहेत. कोरोनाचं संकट गडद असताना डाॅक्टर जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आरोग्य यंत्रणा, प्रशासन व सरकार यांच्या समन्वयातून कोरोनाची लढा दिला जात आहे. असे राजेश टोपे यांनी पत्रात सांगितले.
इथे हि वाचा