भोपाळ | हिंदू महासभेकडून मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे गोडसे ज्ञानशाळा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे युवकांपर्यंत नथुराम गोडसेचे विचार पोहचवले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
रविवारी ही शाळा सुरू करण्यात आली. या कार्यक्रमात नथुराम गोडसेबरोबर अनेक महापुरूषांचे फोटो ठेवण्यात आले होते.
गोडसे ज्ञानशाळेचे उद्घाटन झालं आहे. आमच्या सोबत तरुणांसह अनेक महिला देखील आहेत. गुरु गोविंद सिंग, डॉ. हेडगेवार, वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सारख्या महापुरुषांपासून गोडसे यांनी प्रेरणा घेतली होती, असं असं हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भाद्वाज म्हणाले.
या देशाचे कुणीही विभाजन केलं तर हिंदू महासभा त्याला प्रखरपणे उत्तर देईल. हिंदू महासभेकडून पुन्हा एकदा नथुराम गोडस निर्माण करण्यात येईल, असं जयवीर भाद्वाज यांनी म्हटलंय. यानंतर एक नवा वाद निर्माण शक्यता आहे.