कोरोणाचा चाचणीचा रिपोर्ट नसल्याने रुग्णालयांनी नाकारले….

Spread the love

मुंबई |  प्रत्येकाच्या कानावर कोरोणाच्या रुग्णांवर योग्य उपचार होत नाही अशा घटना ऐकायला येत आहेत. अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये घडला. कोरोणा चाचणीचा अहवाल नसल्याने खाजगी रुग्णालयांनी रुग्णास नकार दिला. अखेरीस तरुणाला आपला जीव रिक्षातच गमवावा लागला.

हा तरुण घोडबंदर येथील मानपाडा येथे राहत होता. या तरुणाला काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते .म्हणून त्याने एक जुलैला कोरोणाचे चाचणी केली परंतु ,त्याला चाचणीचा अहवाल मिळाला नव्हता.

मात्र या तरुणाला अचानक शुक्रवारी जास्तच त्रास होऊ लागला. म्हणून नातेवाईकांनी 3 4 खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु अहवाल नसल्याने रुग्णालयाने नकार दिला.

खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोणा चाचणीचा अहवाल नसल्याने त्याला तपासण्यासाठी नकार दिला. अखेरीस त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांने रिक्षातच आपला जीव गमावला.

इथे ही वाचा

महापौरांच्या पाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोणाची लागण….

100 जणांना वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू..

ठरलं…. प्रिया बेर्डेंवर राष्ट्रवादीच्या या विभागाची जबाबदारी!


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published.