Monday, January 25, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result
Home Maharashtra

वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे

by admin
June 26, 2020
in Maharashtra, Mumbai
0
वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर – राजेंद्र पातोडे
227
SHARES
7.9k
VIEWS
Share on Facebook

मुंबई, दि. २४ – लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तींन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना देऊन त्यांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. तथापि ही सवलत नसून शासकीय लूटीला राजाश्रय दिला जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांची मीटर रिडींग घेण्यात आली नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात आले. त्यामुळे मार्च ते जून पर्यंतचे रिडींग घेऊन एकूण वीजवापराचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. हे सरासरी बील आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर जाताच त्याच्या दरात मोठी वाढ करण्यात येत आहे. गृहीत धरा की तीन महिन्याचे सरासरी बिल हे ६६४ युनिट असेल तर त्याला ११. ७१ प्रमाणे आकार लागेल व त्याचे तीन महिन्याचे बिल हे ७७७५ इतके होईल. शिवाय त्या मध्ये इतर चार्ज समाविष्ट केल्यास ती रक्कम ८४०० इतकी होईल.

हेच बिल दरमहा आकारले तर ६६४ भागीले तीन महीने केले असता दरमहा २२१.३३ इतका वीज वापर होतो. त्याचा वीज दर २२१.३३ x ७. ५० पैसे केला तर हे बिल १६५९. ७५ होईल व दरमहा १६५९.९७ प्रमाणे वीज बिल असल्यास तीन महिन्याचे ४९७९.९२ इतके वीज बिल येईल. परंतु महावितरणने हे सरासरी बिल देताना ८४०० इतके दिले आहे. कारण एकत्रित बिलामुळे वीज आकारात वाढ झाली आहे. वीज बिल आकारणी करताना घरगुती वीज ग्राहकास १०० युनिट पर्यंतचा दर हा २,५७ पैसे अधिक इंधन समायोजन आकार घेतला जातो. १०० ते ३०० युनिट पुढे ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार लावला जातो.३०० ते ५०० युनिटचा ६,५१ पैसे तर ५०१ ते १००० युनिट पर्यंत ७,५५ पैसे आणि १००० युनिट पुढे हा आकार ७,८१ पैसे आहे.

ही दर आकारणी पाहता दरमहा १०० ते ३०० युनिट साठी ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार असलेल्या ग्राहकांना सरासरी बिलामूळे ५०० युनिट पेक्षा अधिकचा ७,५५ पैसे दर लावण्यात आला आहे. त्यामुळे वीज बिलात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली आहे. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा आहे. ही महावितरणची मनमानी असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.

एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्याचे तसेच ग्राहकांनी एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येईल, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.परंतु वीज बिल न भरता ही दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे दिलेल्या रकमेच्या अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकाला करावा लागेल.

सोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्यासाठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.
महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही, असे ऊर्जामंत्री सांगत असले तरी जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिले आहे. त्यामध्ये ग्राहकांना लुटण्यात येत आहे.सबब वीज ग्राहकांनी ही अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये. https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपल्या रीडिंगची तपासणी करावी व सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच वीज बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

बाईट – राजेंद्र पातोडे
प्रवक्ते – वंचित बहुजन आघाडी

इथे हि वाचा

राज्य मंडळाचा मोठा निर्णय…. राज्यात सलून आणि जिम सुरू करण्यात यावे.

पोलिसांकडून ट्विटरला पत्र? सुशांतच्या ट्विटर पोस्ट डिलीट….

सुशांतचा मूव्ही ‘दिल बेचारा’ रिलीजिंग ची तारीख ठरली

loading...

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

admin

admin

Next Post
रेल्वे बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय….?

रेल्वे बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय....?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 23 other subscribers

ताज्या बातम्या

  • आजपासून डाउनलोड करता येणार आधारप्रमाणे वोटर कार्डची पीडीएफ कॉपी
  • मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा असून काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत आहेत
  • आजपासून ऐकू येणार नाही अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून
  • पंतप्रधान मोदींसह, सर्व मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांना दिली जाणार कोरोना लस
  • १०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्स गुगलने प्ले स्टोरवरून हटवले
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

%d bloggers like this: