जर चिनी सैन्याने घुसखोरी केलीच नाही, तर आता माघारी का जात आहात …

नवी दिल्ली | लोकसभेचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीलडाखमधून चिनी सैन्याने माघार घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर जोरदार टीका केली.

त्याचबरोबर असुद्दिन यांनी जर कोणी आपल्या देशामध्ये घुसखोरी केलीच नव्हती तर ते परत कसे जात आहेत?, असा प्रश्न केला आहे. त्याच बरोबर चीनने डी अ‍ॅक्सलेशन सुरु केल्याचा अर्थ काय?, असंही ओवैसींनी विचारलंय.

ओवेसींनी ट्विटरवर ट्विट करत त्यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहे. एएनआयने पोस्ट केलेल्या अधिकृत वक्तव्यावर ट्विट करत ओवैसींनी प्रतिक्रिया देताना मला तीन शंका आहेत असं म्हटल आहे .

डी अ‍ॅक्सलेशन म्हणजे चीन ला जे हवं होतं ते मिळाले आहे असा याचा अर्थ घ्यावा का? चीनने घुसखोरी केली नव्हती आणि कोणत्याही प्रकारचा घुसखोर नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं मग हे डी अ‍ॅक्सलेशन कसलं?, त्यांनी तर 6 जून रोजीही डी अ‍ॅक्सलेशनसाठी सहमती दर्शवली होती ना?, मग आपण चीनवर विश्वास का ठेवत आहोत ,असे प्रश्न ओवैसींनी ट्विट करत विचारले आहे.

इथे ही वाचा

“आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप!”

शिवसेनेचे नगरसेवक फोडणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पत्नी मात्र अजूनही शिवसेनेत!

चीनशी युद्ध झाल्यास भारताच्या बाजूने अमेरिका सैन्य लढणार, व्हाईट हाऊसने केली मोठी घोषणा!

Share

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: