नारायण राणे-कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर…

मुंबई /भाजपचे खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.

कोकणी माणसांसाठी गणेश उत्सव हा त्यांचा महत्त्वाचा सण असतो. तसेच कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेली चालणार नाही त्याचे आई-वडील, पत्नी गावी असतात. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे असं नारायण राणे यांनी म्हटले.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी कोणीही बंदी घालू नये. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना जर बंदी घालण्यात आली तर आम्ही आंदोलन करू.त्यांना कोणत्याही पासची सक्ती घालू नये. कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण काळजी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, याआधी भाजप नेते आशिष शेलार यांनी चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली होती आता त्यांच्या नंतर नारायण राणे यांनी मागणी केली.त्याच बरोबर आशिष शेलार यांनी ट्विट करत सांगितले की, लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि गणपती बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती.

इथे ही वाचा

धक्कादायक !; विकास दुबेचा एन्काऊंटर होण्याआधी मीडियाच्या गाड्या अडवल्या

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

कोरोणा वरील सर्वात स्वस्त जेनेरिक औषध बनवण्यात भारताच्या या कंपनीला यश…

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: