मानवामधील वाईट वृत्तीचा घातक विषाणू हा कधी संपेल काय माहित?

0
4

आज सर्वांना जोडणारा सोशल मीडिया आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर हा अगदी लहानमुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेचजण करतात. सकारात्मक बाब म्हणजे सोशल मीडियामुळे आपले सर्व मित्र मैत्रिणी भेटू लागले. तसेच अनेक चळवळी देखील या सोशल मीडियावर तयार झाल्या.
पण सोशल मीडियाचा काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर देखील करीत आहे. या सोशल मीडियाचा गैरवापरामुळे अनेक जणांना खूप मानसिक त्रास देखील झाला असून, कित्येक तरुण-तरुणींनी आत्महत्या करण्यापर्यंत पावले उचलली आहेत. मागे एक पोस्ट व्हायरल झाली होती, त्यात इंस्टाग्रामवर एक शंभर मुलांचा ‘बॉयस लॉकर रूम’ ग्रुप असून त्यात प्रायव्हेट अकाउंट वाल्यांचा फोटो घेऊन अश्लीलपद्धतीने मॉर्फ केला जातो. तसेच आजही अनेक मुलींचे फोटो बेकायदेशीर पणे पॉर्न वेबसाईटवरील जाहिरातींवर वापरले जातात. तेव्हा अशा प्रकरणांपासून सतर्क असलं पाहिजे. या सोशल मीडियावरून मुले व मुली अशा दोघांनाही फसवण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया वापरता दक्षता घ्या. कोणी त्रास देत असेल तर आपल्या जवळच्या मित्राचा सल्ला घ्यावा.

आपल्या भारतात माध्यम साक्षरता आजही कमी आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना सोशल मीडियाच्या मार्फत पैशांचा गंडा घातला जातो. त्यात असा गैरवापर झाला तर त्या गोष्टीला सामोरे कसे जावे हे शिकवले जात नाही. परंतु सोशल मीडिया हा किती वाईट आहे हे नागरिकांच्या मनावर जास्त बिंबवले जाते. आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत अशा घटना घडल्यास तेव्हा त्याचा सामना कसा करता येईल हे त्यांना शिकवले पाहिजे.

अत्याचार झाला म्हणून निमूट बसण्यापेक्षा इंटरनेटचा वापर करून त्याला कसे जेरबंद करता येईल, या गोष्टीचा विचार तरुणांनी, नागरिकांनी केला पाहिजे. आयटी कायदा 2000 आणि सोशल मीडिया याविषयी आपल्याला विस्तृत माहिती असली पाहिजे. महिलांसाठी सुद्धा १४ महिला कायदेशीर हक्काविषयी माहिती असली पाहिजे. सोशल मीडियावर सुद्धा आज अकाऊंट प्रायव्हसी हेसुद्धा आपल्यासमोर ऑप्शन्स आहे तर त्याचा सुद्धा वापर करावा.

आपल्या सोबत एखादी वाईट घटना झाली की, आपण इतर मुलांना किंवा मुलींना सुद्धा त्याच नजरेने बघतो. या वाईट वृत्तीचा त्रास अनेकदा इतरांना भोगावा लागतो. या सर्व गोष्टींमुळे आपण कोणावर विश्वास देखील ठेवायचा कि नाही हा प्रश्न उपस्थित होतो.

सोशल मीडियाचा चांगला वापर करून अनेक लोक पुढे आले आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव सुद्धा मिळाला आहे. सोशल मीडिया ही सध्या काळाची गरज आहे. आज सर्वीकडे टाळेबंदी (लॉकडाऊन) चालू आहे. आज या परिस्थितीत सगळीकडे ऑनलाइन कोर्सेस चालू आहे. सोशल मीडियामुळे आपल्याला अनेक गोष्टी समजत आहेत. काही समाजकंटकांमुळे सोशल मीडियाचा गैरवापर केला जातो. ह्याकरता समाजाने विशेषता महिलांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. आपण जेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेऊ तेव्हाच मानवामधील वाईट वृत्ती कुठेतरी नष्ट होईल.

शितल गमरे

( वरील माहितीशी TOM सहमत असेल असे नाही,पण सध्या परिस्थिती वर अगदी समाजात घडणाऱ्या गोष्टींचे वास्तव लेखिकेने मांडले आहे , तसेच कायदे माहिती करून घेणे व त्याचा योग्य उपयोग करणे हे भारतीयांचे कर्तव्य आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here